हार्दिक अभिनंदन!
मीना प्रभुंच्या "जगप्रवास" या लोकप्रिय प्रवासवर्णनास प्रकाशनपुर्व विक्रमी नोंदणी करुन भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वाचकरसिकांना, पुस्तकविक्रेत्यांना आणि पुरंदरे प्रकाशनाच्या चाहत्यांना मन:पुर्वक धन्यवाद.
"जगप्रवास" या पुस्तकाची नोंदणी मर्यादित आवृत्तींसाठी उपलब्ध होती, सर्व आवृत्तींची नोंदणी पूर्ण झाल्यामुळे आता ही नोंदणी बंद करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी कॄपया पुरंदरे प्रकाशनाच्या मुख्य कार्यालयात फोन अथवा ई-मेलने संपर्क करावा.
मीना प्रभूंची लोकप्रिय आणि संग्रहाय्य प्रवासवर्णनं
गेल्या दहा-पंधरा वर्षात जगभर पर्यटनाची धूमधाम अनेक पटींनी वाढली.योगयोगानं नेमक त्याच काळात मीना प्रभूंची प्रवासानुभवाची पुस्तकं लागोपाठ आली.आणि ती वाचकांना अतिशय आवडली.मराठी चाकोरी बाहेरच्या
प्रदेशातल्या या लेखी भटकंतीमध्ये ’त्यांचा प्रवास’ हा मुख्य धागा होताच पण त्याबरोबर त्या त्या देशाचा इतिहास, भूगोल, संस्कॄती, कथा-दंतकथा, तिथली आजची जीवनपध्दती, सणवार आणि या अफाट प्रवासांतून भेटलेली माणसं यांच्यासह विणलेला, साडेतीन हजार पानांचा बहुपेडी गोफ होता.सूक्ष्म निरीक्षणशक्तिनं आणि संवेदनशील मनानं जे जे टिपलं ते त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवलं.
यातला बहुतेक प्रवास मग तो कितीही अडचणीचा, धोक्याचा वा शारिरीक परीक्षेचा असो त्यांनी एकटीनं निभावला. त्यावेळी दिसणारी त्यांची साहसी वॄत्ती, जिद्द, चिकाटी आणि धडपड केवळ थक्क करून सोडणारी.इतक्या विविध देशांवरची प्रवास-पुस्तकं एका लेखकानं लिहिल्याचं इंग्लिशमधेही उदाहरण नाही मग मराठी वा इतर भारतीय भाषांमधे तर नाहीच नाही.
साध्या-सोप्या, रसाळ, विनोदी पखरण असलेल्या ओघवत्या भाषेत आलेली ही दहा पुस्तक वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. बाहेरच्या जगाचं बहरलं आभाळ मराठी डोळयांनी त्यांना प्रथमच दिसत होतं. मराठी प्रवासवर्णन साहित्यात एक नव दालन त्यांनी उघडलं आणि लगोलग दहा पुस्तक लिहून ते श्रीमंतही करून टाकलं. शासकीय आणि खाजगी पारितोषिकांचा त्यांच्यावर वर्षाव झाला. समीक्षक आणि वरिष्ठ साहित्यिक यांच्याही ती पसंतीला उतरली.
सुप्रसिध्द कादंबरीकार कै.श्री. ना. पेंडसे. आपल्या पत्रातून असे मनोगत व्यक्त करतात,
"मीना, गेले काही दिवस मी अनोख्या आनंदात होतो.मी अनोख्या अशाकरता म्हणतो की या प्रवासवर्णनांनी मला चक्क बांधून ठेवले होते.
तुझ्या लेखनाला संजीवक शैली आली आहे.तू सांगतेस ते जिवंत होऊन समोर येते.आपण स्वतः ते पाहत आहोत, जगत आहोत असे वाटते.त्यांतले जग मनात रेंगाळते.असा अनुभव फक्त कादंबरीच देऊ शकते. तरी ही किमया तू केलीस.तुझ्या पुस्तकांना मी मराठी प्रवासवर्णन ग्रंथात अपूर्व समजतो तुझे किती अभिनंदन करू?"
जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी आखलेल्या या सवलत योजनेचं आपणही असंच अभिनंदनपूर्वक स्वागत करालशी आशा आहे.
प्रकाशक:
अमृत पुरंदरे.
पुरंदरे प्रकाशन.
|